सात कोरोनामुक्त, नऊ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:27 IST2021-08-29T04:27:59+5:302021-08-29T04:27:59+5:30

चंद्रपूर : गत २४ तासात जिल्ह्यात सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नऊ जण नव्याने ...

Seven coronal free, nine positive | सात कोरोनामुक्त, नऊ पॉझिटिव्ह

सात कोरोनामुक्त, नऊ पॉझिटिव्ह

चंद्रपूर : गत २४ तासात जिल्ह्यात सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नऊ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ३, चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर १, सिंदेवाही व वरोरा तालुक्यात प्रत्येेकी एका रुग्णाचा समावेश आहे.

भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, कोरपना, जिवती तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६३८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ४८ झाली आहे. सध्या ५१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७० हजार ९३९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ८० हजार ४०३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३९ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Seven coronal free, nine positive