बल्लारपुरातील महिला समुपदेशन केंद्रात ३०० प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:04+5:302021-01-23T04:29:04+5:30

२३ प्रकरणे प्रलंबित आहेत. हे समुपदेशन केंद्र येथील पोलीस स्टेशनमध्ये नऊ वर्षांपासून कार्यरत आहे. या केंद्रांतून बल्लारपूर, पोंभुर्णा, ...

Settlement of 300 cases at Ballarpur Women's Counseling Center | बल्लारपुरातील महिला समुपदेशन केंद्रात ३०० प्रकरणांचा निपटारा

बल्लारपुरातील महिला समुपदेशन केंद्रात ३०० प्रकरणांचा निपटारा

२३ प्रकरणे प्रलंबित आहेत. हे समुपदेशन केंद्र येथील पोलीस स्टेशनमध्ये नऊ वर्षांपासून कार्यरत आहे. या केंद्रांतून बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी, धाबा, लाठी, गडचांदूर, कोरपना, जिवती, राजुरा, उमरी, भारी, कोठारी, विरुर अशा एकूण १३ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पती-पत्नी यांच्या गंभीर तक्रारींचा निपटारा केला जातो. बरेच व्यसनी नवरे दारूपायी पत्नीला नियमित मारझोड करतात तसेच, चारित्र्यावर संशय, सासूसोबत भांडण या कारणांमुळे पत्नीला घराबाहेर हाकलून देतात. त्रास देतात. कंटाळून पीडित महिला पोलिसांकडे तक्रार करते. असे प्रकरण समजुतीने निपटावे तसेच पीडित महिलेला न्याय व संरक्षण मिळावे या हेतूने बालविकास व महिला कल्याण विभागाकडून राज्यात महिला समुपदेशन केंद्र उघडण्यात आले आहेत. पती-पत्नीच्या तक्रारींचे प्रकरण पोलीस या केंद्राकडे वर्ग करतात. केंद्रातील समुपदेशक पती व पत्नी या दोघांनाही वेगवेगळे बोलावून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतात. त्यानंतर दोघांनाही एकत्रित बसून त्यांचे समुपदेशन करून याबाबतच्या कायद्याची माहिती त्यांना देण्यात येते तसेच दोघेही विलग झाल्यास दोघांनाही नंतर होणारा त्रास, अपत्यांवर त्याचा वाईट परिणाम आदींची समर्थपणे जाणीव करून देतात. येथील समुपदेशाचे काम अर्चना टोंगे (पोतराजे) तसेच खुशबू पाल या बघत असून त्यांना महिला पोलीस कर्मचारी कविता मडावी या सहकार्य करतात.

कोट

आजवर कितीतरी विस्कळलेली संसार समुपदेशामुळे परत स्थिरावली आहेत.

दारू पिऊन पत्नीला मारझोड ८० टक्के, चारित्र्यावर संशय व इतर कारणे २० टक्के, अशी पती-पत्नी यांच्यात भांडणाची कारणे असतात

- अर्चना टोंगे, समुपदेशक.

Web Title: Settlement of 300 cases at Ballarpur Women's Counseling Center