शाळेच्या वीज बिलांबाबत तोडगा काढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST2021-07-17T04:23:03+5:302021-07-17T04:23:03+5:30

चंद्रपूर: राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून तोकडी रक्कम मिळते. त्यामध्ये शाळेचे वीज बिल भरणे अशक्य होत ...

Settle the school electricity bill | शाळेच्या वीज बिलांबाबत तोडगा काढावा

शाळेच्या वीज बिलांबाबत तोडगा काढावा

चंद्रपूर: राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांना देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून तोकडी रक्कम मिळते. त्यामध्ये शाळेचे वीज बिल भरणे अशक्य होत आहे. शाळांचे वीज बिल जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमधून भरण्याची तरतूद करावी किंवा पूर्णपणे बिल माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने केली असून यासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन दिले.

चंद्रपूर येथे ते आले असता यावेळी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, पदाधिकारी हिराचंद बोरकुटे, बेबी उईके, सुनील दहेगावकर, डॉ. देव कन्नाके, माणिक लोणकर, संजय वैद्य, प्रियदर्शन इंगळे यांची उपस्थिती होती.

राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये ई लर्निंग, संगणक, टीव्हीची व्यवस्था शासन व लोकसहभागातून करण्यात आली आहे. त्यामुळे मासिक वीजबिल हजार ते दोन हजारांच्या घरात येते. मात्र, ते भरण्यासाठी शाळांकडे पुरेसा निधी उपलब्ध नसतो. शासनाकडून अतिशय अल्प निधी शाळांना मिळतो. यामध्ये शाळेची डागडुजी, स्टेशनरी यातच खर्च होतो. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळात पुरोगामी शिक्षक समिती राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्यासह पदाधिकारी मनोज बेले, गणेश कागदेलवार, पंकज उद्धरवार, प्रशांत कावळे, श्रीकृष्ण लोनबले यांची उपस्थिती होती.

Web Title: Settle the school electricity bill