भद्रावतीत ग्रामसेवक संघटनेचे अधिवेशन

By Admin | Updated: April 12, 2016 03:38 IST2016-04-12T03:38:15+5:302016-04-12T03:38:15+5:30

ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अधिवेशन स्थानिक वृंदावन सभागृहात रविवारी पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन आ.

Session of the Bhadravati Gramsevak Sangh | भद्रावतीत ग्रामसेवक संघटनेचे अधिवेशन

भद्रावतीत ग्रामसेवक संघटनेचे अधिवेशन

भद्रावती: ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अधिवेशन स्थानिक वृंदावन सभागृहात रविवारी पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे प्रमुख अतिथी म्हणून राज्यसरचिटणीस प्रशांत जागोदे, राज्य कोषाध्यक्ष बापूजी अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, उपविभागीय उपाध्यक्ष अनिल कोहळे, उपविभागीय सहसचिव विलास खोब्रागडे, धनंजय साळवे व जि.प. सदस्य विजय वानखेडे, संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण ठोपरे, सचिव करुणाकर कुंभारे, जिल्हासचिव युसूफ काझी, व्यासपिठावर उपस्थित होते.
ग्रामसेवकांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देऊ, असे अश्वासन उद्घाटनपर भाषणातून आ. बाळू धानोरकर यांनी दिले.
नरेगा ही योजना मरेगा होणार नाही, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यास संघटना भाग पाडेल, असे संघटनेचे राज्यअध्यक्ष एकनाथ ठाकणे म्हणाले. सेवकाला मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगातील वेतनासह ग्रामसेवकांच्या विविध समस्यांचा ढाकणे यांनी आपल्या भाषणातून ऊहापोह केला. जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील एकाही ग्रामसेवकाची शिफारस आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी केलेली नाही. याबाबत प्रशासनाने केलेला अन्याय संघटना खपवून घेणार नसल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी उपविभागीय सहसचिव विलास खोब्रागडे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेश राठोड संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन दिलीप ताकसांडे, प्रास्ताविक विलास चौधरी तर आभार महेंद्र भालेधरे यांनी मानले. अधिवेशनाला मोठ्या संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Session of the Bhadravati Gramsevak Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.