नातेवाईक समजून रुग्णांची सेवा करा

By Admin | Updated: June 25, 2015 01:24 IST2015-06-25T01:23:39+5:302015-06-25T01:24:53+5:30

आरोग्य सेवा ही मोठी सेवा आहे. रुग्णांची हेळसांड होऊ देता कामा नये. रुग्णांना आपले नातेवाईक समजून त्यांची ....

Serve patients with a relative understanding | नातेवाईक समजून रुग्णांची सेवा करा

नातेवाईक समजून रुग्णांची सेवा करा

भद्रावती: आरोग्य सेवा ही मोठी सेवा आहे. रुग्णांची हेळसांड होऊ देता कामा नये. रुग्णांना आपले नातेवाईक समजून त्यांची तपासणी करावी व औषधोपचार करावा, असे आवाहन आ. बाळू धानोरकर यांनी डॉक्टर तथा अन्य कर्मचाऱ्यांना केले.
भद्रावती- वरोरा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पार पडलेल्या येथील एका कार्यक्रमाअंतर्गत स्थानिक ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली व तेथील रुग्णांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी ते अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलत होते. यावेळी स्थानिक बसस्थानकाच्या आवारात बाळू धानोरकरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संपूर्ण स्थानकाची पाहणी करुन येथील समस्यांचा त्वरित निपटारा करण्याच्या सूचना स्थानिक नियंत्रकाला केल्या. या दोन्ही कार्यक्रमात भद्रावतीचे नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, तालुका प्रमुख भास्कर ताजणे, उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर, दिलीप पारखी, नितीन कवासे, मोरेश्वर आवारी, वसंता उमरे, माजी नगराध्यक्ष चंद्रकला आवारी, तालुका संघटिका वैशाली पारखी, नगरसेवक प्रशांत झाडे, प्रमोद गेडाम, संदीप वडाळकर, विनोद वानखेडे, नगरसेविका माधुरी कळमकर, शुभांगी उमरे, रेखा खुटेमाटे, शोभा सातपुते व नालंदा पाझारे, मिनल आत्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शासनाच्या आरोग्यदायी योजनेत सिकलसेल रोगांचा समावेश करणे, या रुग्णांचा व सोबत असलेल्या एका व्यक्तीला बस भाड्यात सवलत देणे व भद्रावतीच्या रुग्णालयातील असलेल्या ३० खाटा वाढवून त्या ५६ करणे असा प्रस्ताव शासनाला सादर करणार असल्याचे आ. धानोरकरांनी सांगितले. या व्यतिरिक्त भद्रावती बसस्थानकाच्या आवारातील अतिरिक्त जागेत नागरिकांना बसण्याकरिता पाच ते सात खुर्च्या लावण्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले व आरोग्य विषयक समस्या निकालात काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Serve patients with a relative understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.