बनावट तंबाखू सेवनाने वाढले तोंडाचे गंभीर आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST2021-01-14T04:22:46+5:302021-01-14T04:22:46+5:30
खडसंगी : कोरोना कालावधीत मागील वर्षी अवैध व बनावट तंबाखू विक्री झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याचे ...

बनावट तंबाखू सेवनाने वाढले तोंडाचे गंभीर आजार
खडसंगी :
कोरोना कालावधीत मागील वर्षी अवैध व बनावट तंबाखू विक्री झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याचे निदर्शनास येत आहे.
सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही काही ठोक विक्रेते हे परजिल्ह्यातून सुगंधित तंबाखू छुप्या मार्गाने जिल्ह्यात आणून विक्री करीत आहेत.
बनावट तंबाखू विक्रीचे प्रमाण जास्त असून जास्त फायदा मिळविण्यासाठी अतिशय घातक सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री दुकानांमधून होत आहे.
तंबाखू सेवनाने नागरिकांच्या तोंडाचे गंभीर आजार वाढलेले असून दवाखान्यात या आजाराचे रुग्ण वाढले आहेत.
‘असली’ आणि ‘नकली’ असे सध्या खर्रा प्रकार असून याच माध्यमातून तरुणांना, वृद्ध लोकांना, स्त्रियांना तोंडाचे गंभीर आजार झाले आहेत.
सुगंधित बनावट तंबाखूची लाखोंची विक्री होत असून या व्यसनाला तरुण मुलेसुद्धा आहारी गेली आहेत.
शासनाने तंबाखू विक्री पुरवठा करणाऱ्या रॅकेटवर त्वरित आळा घालण्याची मागणी जनतेने केली आहे.