तळोधी येथील लोकविद्यालयात विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:54+5:302021-04-25T04:27:54+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील लोकविद्यालयात कोरोनाअंतर्गत शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र, ...

तळोधी येथील लोकविद्यालयात विलगीकरण कक्ष
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील लोकविद्यालयात कोरोनाअंतर्गत शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत तथा लोकसहभागाच्या सहकार्यातून शनिवारी कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाने शहरी भागातून आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. दरम्यान तळोधी (बा.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेता येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत तसेच लोकसहभागाच्या सहकार्यातून येथील लोकविद्यालय शाळेत शनिवारी कोरोना विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहेत. येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना केवळ राहता येणार आहे आणि बेडची सुविधासुद्धा करण्यात आली आहे. अन्य सुविधासुद्धा येथे मिळणार आहेत. विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सरपंच छाया मदनकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपसरपंच राजेश घिये, जिल्हा परिषदेचे सदस्य खोजराम मरस्कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य नरेश खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य विलास लांजेवार, आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप राठोड, तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे, सहायक शिक्षक प्रमोद पाकमोडे, आदींची उपस्थिती होती.