ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती आहे

By Admin | Updated: August 22, 2015 01:35 IST2015-08-22T01:35:18+5:302015-08-22T01:35:18+5:30

देशाचा नागरिक हा कोणत्याही क्षेत्रात सेवारत असला तरी तो कुटुंबाप्रति, समाजाप्रति आणि देशाप्रति कार्यरत असतो.

Senior citizens are national wealth | ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती आहे

ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती आहे

मॅथ्यू निरप्पेल : ब्रह्मपुरीत सत्कार सोहळा
ब्रह्मपुरी : देशाचा नागरिक हा कोणत्याही क्षेत्रात सेवारत असला तरी तो कुटुंबाप्रति, समाजाप्रति आणि देशाप्रति कार्यरत असतो. त्याची सेवा ही राष्ट्राला समर्पित असते. त्याचे मूल्य आपणाला कळत नाही. परंतु सेवानिवृत्तीनंतर त्याची सेवा विचारात घेता, ती राष्ट्रीय संपत्ती ठरते, असे मार्मिक विचार रेव्ह. फादर मॅथ्यू निरप्पेल यांनी व्यक्त केलेत.
रेव्ह. फॉ. मॅथ्यू निरप्पेल हे ज्येष्ठ नागरिक संघटना ब्रह्मपुरी व ब्रह्मपुरी सिटिझन फोरम यांच्या वतीने बुधवारी आयोजित सत्कार समारंभप्रसंगी सत्काराला उत्तर देताना बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष बजाज यांनी भूषविले होते.
प्रारंभी आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य सुभाष बजाज यांनी रेव्ह. फा. मॅथ्यू निरप्पेल यांच्या २० वर्षाच्या येथील वास्तव्यावर विस्तृत प्रकाश टाकला आणि त्यांनी केलेल्या कार्याचा उचित शब्दात गौरव करुन ब्रह्मपुरकरांना त्यांचा कधीही विसर पडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर प्राचार्य बजाज यांनी फा. मॅथ्यू निरप्पेल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.
संचालन व आभार प्रा. बाळ गजभिये यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Senior citizens are national wealth