शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगण सीमेलगत कापसाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: January 2, 2017 00:57 IST

सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत

नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका : परजिल्ह्यातील दलालांचा गावागावांत शिरकाव नांदाफाटा : सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात नोटाबंदीमुळे कापसाची ४००० ते ४२०० रुपयात दलालांकडून खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे. बँकामार्फत अधिक रक्कम मिळत नसल्याने याचा फायदा घेत गावांमध्ये शेतकऱ्यांशी दलालांमार्फत नगदी व्यवहार केला जात आहे. यात ५२०० ते ५३०० रुपयांपर्यंत विकला जाणारा कापूस ४ हजार ते ४२०० रुपयात गरजेपोटी शेतकरी देत आहे. वर्धा, हिंगणघाट,यवतमाळ या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील व्यापाऱ्यांचे दलालही या खरेदीत गुंतले आहे. गावात पहाटे येऊन शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळणार नाही. चेकद्वारे पैसे दिल्यास अधिक वेळ लागेल, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांच्या घरी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधींना पाठवून शेतकऱ्यांचे मन वळवून कापूस विक्री करण्यास भाग पाडत असल्याचेही समजते. यात परिसरातील काही जण आपली पोळी शेकताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरपना, जिवती, राजुरा या तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ऐन पिके हाती आल्यानंतर नोटाबंदी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे. जिल्हा सहकारी बँकामार्फत शेतकऱ्यांना अधिक पैसे काढता येत नाही तर दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांचे खाते हे जिल्हा सहकारी बँकेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कौटुंबिक गरज भागविताना वणवण करावी लागत आहे. अनेकांकडे मुलींचे लग्न जुळले असून शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अशातच बँकांकडून पैसे मिळत नसल्याने नाईलाजास्तव दलालांमार्फत कापसाची विक्री करावी लागत आहे. यात शेतकऱ्यांची क्विंटल मागे १ हजार ते १५०० रुपयांची लूट होत असून मोठा फटका बसत आहे. इतर कापूस खरेदी केंद्रावर काही व्यापारी चेकद्वारे पैसे देत आहे. मात्र बँकामार्फत पैसे निघत नसल्यानेही शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. तेव्हा अशा दलालांवर कारवाई करण्याची गरज नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) कापूस संकलन केंद्राचा अभाव ४कापूस संकलन केंद्र यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काही शेतकरी मुकटबन, वणी, हिंगणघाट येथे कापसाची विक्री करतात. तर वाहतुकीचा खर्च अधिक येत असल्याने अनेक शेतकरी गावातच व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत करतात. मात्र भल्या पहाटे येऊन आज भाव एवढाच असल्याचे सांगून दलाल कापसांची खरेदी तेलंगणा सीमेलगतच्या गावातून करीत आहे. नगदी पैसा येतोय कुठून ? बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा दिली असताना कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पैसे असल्याचे दिसून येत आहे. हा पैसा येतोय कुठून, असा सवालही आता नागरिक करीत आहे. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडे नवीन नोटांचा भरणा अधिक आहे. नागरिक चलनटंचाईमुळे गेल्या ५० दिवसांपासून भरडले जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना कोणती बँक पैसे विड्राल करून देते, याचाही शोध घेणे यानिमित्ताने गरजेचे झाले आहे.