बाल परिषदेकरिता शेणगावातील पाच विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:20+5:302021-01-16T04:32:20+5:30

जिवती : संपूर्ण राज्यभर सलाम मुंबई फाउंडेशनमार्फत ऑनलाइन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिवती तालुक्यातील शेणगाव येथील ...

Selection of five students from Shengaon for Bal Parishad | बाल परिषदेकरिता शेणगावातील पाच विद्यार्थ्यांची निवड

बाल परिषदेकरिता शेणगावातील पाच विद्यार्थ्यांची निवड

जिवती : संपूर्ण राज्यभर सलाम मुंबई फाउंडेशनमार्फत ऑनलाइन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिवती तालुक्यातील शेणगाव येथील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणात तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती, स्वओळख आणि आत्मविश्वास, संवादकौशल्य, सवयीची जडणघडण, कौशल्य शाळास्तरावरील बालपंचायत भूमिका व जबाबदारी, समस्या सोडविण्याच्या पद्धती व सामाजिक समर्थन संकल्पना, ध्येयनिश्चिती, तंबाखू नियंत्रण कायदा २००३, कौशल्य विकास नेतृत्व आणि लेखन कौशल्य, मीडिया आणि मीडियाचे वेगवेगळे प्रकार इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.

अंतिम बाल परिषद सराव ३ फेब्रुवारी, २०२१ व राज्यस्तरीय बाल परिषद ४ फेब्रुवारी, २०२१ला आयोजित केली आहे. याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील २५ विद्यार्थी व पाच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची निवड केली आहे. जिवती तालुक्यातून बाबा कोडापे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करीत असून, ऋतुजा ईश्वर वारे, प्रतीक्षा प्रकाश शिंदे, माहेश्वरी सदाशिव वारे, प्रतीक्षा प्रेमदास राठोड व वैष्णवी दत्ता माळगे या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या पाच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी गाव परिसर व पंचायत समिती जिवतीमधील शाळा व गावागावात जाऊन तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्याचे कार्य करतील.

Web Title: Selection of five students from Shengaon for Bal Parishad