बीआयटीच्या ९ विद्याथ्र्यांची नामांकित कंपनीसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:14+5:302020-12-28T04:15:14+5:30
बल्लारपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नालॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जाते़ यावर्षी ५ ते ७ ...

बीआयटीच्या ९ विद्याथ्र्यांची नामांकित कंपनीसाठी निवड
बल्लारपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नालॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जाते़ यावर्षी ५ ते ७ डिसेंबर २०२० या कालावाीत एसएमएस लिमि़ नागपूर या कंपनीसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते़ माईनिंग विभागातील पदवी आणि पदविकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता़ सदर नामांकित कंपनीच्या निवड प्रकि्मध्ये ९ विद्यार्थांची एकाच वेळी निवड करण्यात आली़ यामध्ये बी़ ई़ माईनिंग शाखेतील रोहीत पवार, ई. रोहीथ, उदय यादव उमंग मेश्राम, सारंग काळबांडे, के. व्यंकटेश तर माईिनंग डिप्लोमामध्ये कि्रष्णा कुमार , करण कुमार रोहित कुमार केशरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर महाविद्यालयाचा एकाचवेळी ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य डाॅ. रजनीकांत व प्रचार्य गोजे यांनी काैतुक केले आहे. सदर कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या आयोजनासाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख अमृता बल्लाळ आणि ज्योती मोरई यांनी प्रयत्न केले.