शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार परिसरासाठी २१८ गावांची निवड

By admin | Updated: March 6, 2015 01:12 IST

आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.

चंद्रपूर : आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. येत्या डिसेंबर-२०१५ अखेर यंदा निवड झालेल्या २१८ गावांमध्ये काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती जिलहाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी जलयुक्त हे अभियान आहे. संपूर्ण राज्यामध्ये ते राबविले जात असून चंद्रपूर जिल्ह्यातील २१८ गावांची निवड पहिल्या टप्प्यात झाली आहे. त्यापैकी ६६ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे.गावांची निवड करताना टंचाईग्रस्तता, आणेवारीतील घट आणि नागरिकांची मागणी या तीन बाबी लक्षात घेतल्याचे सांगून ते म्हणाले, ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबवायची असून आगामी पाच वर्षांचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी निधीचीही तरतुद झाली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक आमदारांकडून ५० लाख रूपयांचा निधी या कामी दिला जाणार असून त्यातून तीन ते चार कोटी रूपये मिळणार आहेत. या योजनेमध्ये सरकारच्या आठ यंत्रणा सहभागी असून त्यात जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना, सामाजिक वनिकरण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. मामा तलाव, सिमेंट फ्लग बंधारे आणि शेततळ्यांच्या निर्मीतीचेही उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने डोळयापुढे ठेवले आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत एक हजार शेततळयांची निर्मीती होणार असून ५५४ माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. १३८ सिमेंट फ्लग बंधाऱ्यांचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने आखले होते. मात्र ९८ बंधारे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याने या कामाचे नियोजन झाले आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना व जीवती या पाच तालुक्यांखेरिज अन्य १० तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात झाली आहे. यात मूल तालुका आघाडीवर आहे. तेथील १९ गावांमध्ये ३२ पैकी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ पोंभुर्णा तालुक्याचा क्रमांक आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी संजय दैने, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. अदमाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)