सकमूर येथून चोरबीटी बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:15 IST2019-03-23T22:15:34+5:302019-03-23T22:15:58+5:30
तालुक्यातील सकमूर येथील रहिवासी जितेंद्र पत्रुजी घुबडे यांच्या घरातून खुले बियाणे ३७ किलो व २३ पॉकीटे असे एकूण १३ हजार रूपयांचे चोरबिटी बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले.

सकमूर येथून चोरबीटी बियाणे जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : तालुक्यातील सकमूर येथील रहिवासी जितेंद्र पत्रुजी घुबडे यांच्या घरातून खुले बियाणे ३७ किलो व २३ पॉकीटे असे एकूण १३ हजार रूपयांचे चोरबिटी बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले.
ही कारवाई तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या नेतृत्वात शनिवारी करण्यात आली. राजुरा तालुक्यातील लक्कडकोट कृषी अधिकाऱ्यांनीही धाड टाकून दोन ठिकाणी चोरबिटी बियाणे जप्त केले होते. तसेच नाक्यावर ट्रकची तपासणी करून ५४ लाख रूपयांचा माल जप्त केला होता. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी अधिकारी सक्रीय झाले असून चोरबिटीचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.
चोरबिटी बियाणे पुरवठा करण्याचे लक्कडकोट प्रमुख स्थान आहे. तिथून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ट्रकद्वारे तेलंगणा राज्यातून सरळ माल पुरवठा केला जातो. आतापर्यंत जवळपास ३० ट्रक माल विविध ठिकाणी पुरवठा केल्याची चर्चा सुरू आहे. लक्कडकोट येथे पोलीस तपासणी नाका असताना मालाची सरळ वाहतूक होत असल्यामुळे त्यांच्या तपासणीवरच शंका व्यक्त केली जात आहे. हा व्यवसाय ३-४ वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे.