हल्ले करणाऱ्या अस्वलींना जेरबंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST2021-03-16T04:29:47+5:302021-03-16T04:29:47+5:30

पठाणपुरा गेटबाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या परिसरात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात ...

Seize the attacking bears | हल्ले करणाऱ्या अस्वलींना जेरबंद करा

हल्ले करणाऱ्या अस्वलींना जेरबंद करा

पठाणपुरा गेटबाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या परिसरात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात दोघांना जखमी केले होते. त्यानंतर अस्वलीला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, वनविभागाला यश आले नाही. त्यातच सोमवारी सकाळच्या सुमारास अस्वलीने या परिसरालगत असलेल्या लालपेठ येथील भरवस्तीत प्रवेश करून पुन्हा हल्ला केला. वनविभागाकडून अस्वलीला तातडीने जेरबंद करणे गरजेचे आहे. मात्र, वनविभाग फारसे गंभीर नाही. त्यामुळे भविष्यात एखाद्याला जीव गमवावा लागू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश ऊर्फ रामू तिवारी, एनएसयुआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे, संजय गंपावार, अनिस राजा, बंटी शैनेशचंद्र यांचा समावेश होता.

Web Title: Seize the attacking bears