खरीप हंगामासाठी बियाणे साठवणुकीचा सल्ला
By Admin | Updated: March 30, 2015 00:49 IST2015-03-30T00:49:57+5:302015-03-30T00:49:57+5:30
शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरीप हंगामासाठी बियाणे साठवणुकीचा सल्ला
चंद्रपूर : शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
२0१४ मध्ये पावसाचे आगमन उशीराने झाल्यामुळे शेंगा भरताना पिकास ताण पडला. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून या पिकांचे सर्व वाण सरळ असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही.
शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणूनच त्याचा वापर करावा. स्वत:कडील बियाणे वापरल्यास खर्चात बचत होण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे यावर्षी बियाणांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे.(नगर प्रतिनिधी)
अशी घ्या दक्षता
बियाणे साठवताना बियाण्याच्या आर्द्रतेचे प्रमाण १0 ते १२टक्क््यापेक्षा जास्त नसावे. तसेच सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते.बियाणातील बिजांकुर बाह्य आवरणाच्या लगत असते. त्यामुळे बियाण्यास इजा पोहोचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावी. बियाणे साठवताना पोत्याची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सहाफुटापेक्षा जास्त नसावी.
शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सोयाबीन बियाणे वापरल्यास आर्थिक बचत होऊ शकते. यासाठी प्रथम सोयाबीनची उगवनशक्ती तपासून बघावी.
- प्रवीण देशमुख
कृषी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर