कर्नाटका एम्टातील सुरक्षा कर्मचा-यांना थकित वेतन द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST2020-12-27T04:21:18+5:302020-12-27T04:21:18+5:30

: शिवसेना आंदोलन करणार भद्रावती : शहराजवळील बरांज येथील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च ...

Security personnel in Karnataka Emta should be paid a stipend | कर्नाटका एम्टातील सुरक्षा कर्मचा-यांना थकित वेतन द्यावे

कर्नाटका एम्टातील सुरक्षा कर्मचा-यांना थकित वेतन द्यावे

: शिवसेना आंदोलन करणार भद्रावती : शहराजवळील बरांज येथील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च महिन्यापासून थकीत आहे. लॉकडाऊनमध्ये झालेली होरपळ सहन करून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना थकीत वेतन द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनाने दिला आहे.

कर्नाटका एम्टा खाणीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे वेतन मार्च २०२० पासून बंद आहे. त्यामुळे कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले. आर्थिकतेची गंभीर बाब लक्षात घेता त्यांना थकीत वेतन मिळणे गरजेचे आहे.कोळसा खाणीत ३२ सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. वेतन मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कामगारांना थकीत वेतन देण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, शहरप्रमुख नंदू पढाल, तालुका संघटक नरेश काळे, नगरसेवक राजू सारंगधर, घनश्याम आस्वले, येशू आरगी, गौरव नागपुरे यांनी केली आहे.

Web Title: Security personnel in Karnataka Emta should be paid a stipend