दुसरा रूग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:36+5:30

१४ रुग्णांना कोविड केअर सेंटर तर, एक पॉझिटीव्ह १६ व १७ मे रोजी झालेल्या चाचणीनंतर निगेटिव्ह आल्यामुळे संक्रमित आलेल्या रूग्णांमधून कमी करण्यात आले. चंद्रपुरातील दुसरा रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २१ आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

The second patient is coronary free | दुसरा रूग्ण कोरोनामुक्त

दुसरा रूग्ण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देआयसोलेशमध्ये २० रूग्ण : ५६ हजार जणांचे गृह विलगीकरण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात आतापर्यंत कोविड-१९ संक्रमित रूग्णांची संख्या २२ होती. ७ रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. १४ रुग्णांना कोविड केअर सेंटर तर, एक पॉझिटीव्ह १६ व १७ मे रोजी झालेल्या चाचणीनंतर निगेटिव्ह आल्यामुळे संक्रमित आलेल्या रूग्णांमधून कमी करण्यात आले. चंद्रपुरातील दुसरा रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २१ आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यात कोविड-१९ संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन १४ दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. आयएलआय,सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. कोविड-१९ संक्रमित २२ रूग्णांची जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली १, मुंबई ३, ठाणे २, पुणे- ६, यवतमाळ २ नाशिक ३ कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत ५ आहेत. संशयित रूग्णांचे आवश्यकतेनुसार तपासणीसाठी नमुने घेण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

जिल्ह्यात ११ कंटेनमेंट झोन
सध्या जिल्ह्यात ग्रामीण भागात ८ व महानगरपालिका क्षेत्रात ३ असे एकूण ११ कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आले आहेत. या झोनमधील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या १०३ व कमी जोखमीच्या संपर्कातील ९४ अशा एकूण १९७ संपर्कातील व्यक्तींची नोंद घेण्यात आली. १०४ संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Web Title: The second patient is coronary free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.