दुसऱ्या दिवशी ६२ उमेदवार अपात्र
By Admin | Updated: March 24, 2017 00:48 IST2017-03-24T00:48:18+5:302017-03-24T00:48:18+5:30
जिल्हा पोलीस दलाच्या ७२ जागांसाठी बुधवारपासून पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरू आहे. गुरूवारी भरती प्रक्रियेच्या

दुसऱ्या दिवशी ६२ उमेदवार अपात्र
पोलीस भरती : चोख व्यवस्थेत भरती प्रक्रिया
चंद्रपूर : जिल्हा पोलीस दलाच्या ७२ जागांसाठी बुधवारपासून पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरू आहे. गुरूवारी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी ६२ उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र ठरले.
२२ मार्चपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती सुरु आहे. ७२ जागांकरिता १५ हजार ९६२ उमेदवार असून यात ३ हजार ४२२ महिला तर १२ हजार ५४० हे पुरुष उमेदवार आहेत. आधी शारीरिक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी व शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरूप आहे.भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी १ हजार उमेदवारांना शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ७२२ उमेदवार हजर होते. त्यामधील ६२ उमेदवार हे शारीरिक मोजमापामध्ये अपात्र ठरले आहे. मैदानी चाचणीला ६६० उमेदवार सामोरे गेले आहे.
यावर्षी प्रथमच लेखी चाचणीकरिता उमेदवाराच्या बोटांचे ठसे घेण्यात येणार आहे. ज्यामुळे शारीरिक चाचणीस एक व लेखी चाचणीस दुसराच उमेदवार हजर राहण्यास प्रतिबंध बसणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)