गुरुदेव सेवा मंडळाची द्वितीय केंद्रीय सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:51+5:302021-03-24T04:25:51+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे गुरुदेव सेवा मंडळ, नागभीड विभागाच्या वतीने द्वितीय केंद्रीय सभा पार पडली. या ...

गुरुदेव सेवा मंडळाची द्वितीय केंद्रीय सभा
सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे गुरुदेव सेवा मंडळ, नागभीड विभागाच्या वतीने द्वितीय केंद्रीय सभा पार पडली. या कार्यक्रमात मधुकर टिकले या कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा होते. प्रमुख पाहुणे म्हणून रेखाताई बुराडे व इतर ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सुबोधदादा यांनी, विश्वाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या अन् विशेषत: आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. अनेकांत एकत्व शोधताना खेड्यांमध्ये या संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरीही प्रत्येक गाव तीर्थ होईपर्यंत राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार होण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रसंतांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त विदर्भात त्यांनी घडविलेल्या बदलावरचा हा एक केंद्रीय बैठकीचा प्रयोग आहे, असे ते म्हणाले. दरम्यान नागभीड तालुक्यातील केंद्रीय प्रमुख म्हणून मधुकर टिकले यांचा फाईल, नोटबुक, ग्रामनाथ दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तळोधी, आवळगाव, आकापूर, उश्राळ मेंढा, कोजबी, गिरगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.