एसटीची हंगामी वाढ
By Admin | Updated: November 7, 2015 00:49 IST2015-11-07T00:49:15+5:302015-11-07T00:49:15+5:30
एस.टी. ने दिवाळी पर्वानिमित्त केलेल्या हंगामी तिकीट दर वाढीने बल्लारपूर ते चंद्रपूरचा बस प्रवास दोन रुपयांनी महागला आहे.

एसटीची हंगामी वाढ
नागपूर आता २०२ रुपये : बल्लारपूर-चंद्रपूर प्रवास दोन रुपयांनी महागला
बल्लारपूर : एस.टी. ने दिवाळी पर्वानिमित्त केलेल्या हंगामी तिकीट दर वाढीने बल्लारपूर ते चंद्रपूरचा बस प्रवास दोन रुपयांनी महागला आहे. या आधी बल्लारपूर ते चंद्रपूरचे तिकीट १९ रुपये होते. आता प्रवाशांना २१ रुपये मोजावे लागत आहे. ही हंगामी वाढ ५ नोव्हेंबरपासून लागू झाली असून ती २५ नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे.
यापूर्वी बल्लारपूर ते नागपूर १८३ रुपये तिकीट होते. आता वाढलेल्या दराप्रमाणे २०२ रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहे. एस.टी. ने केलेली ही दरवाढ हंगामी, म्हणजे २७ नोव्हेंबरपर्यंतच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु २७ नोव्हेंबरनंतर ती कमी केली जाणार का? अशीही शंका काहीजण व्यक्त करीत आहेत. सण वा दिन विशेष निमित्त सवलत दिली जाते. पण, ऐन दिवाळीत येथे तर वाढ केली गेली आहे, हे कसे? असा प्रवाशांचा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)