‘त्या’ इसमाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:47 IST2018-07-09T23:47:06+5:302018-07-09T23:47:19+5:30
वैनगंगा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या घाटकुळ येथील विनोद भाऊजी बोडेकर यांचा शुक्रवारपासून शोध घेतला जात आहे. आपत्कालीन मदत सेवा केंद्राची पाणबुडी बोट व ४ गोताखोर यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही आजपर्यंत त्यांचा मागमूस न लागल्याने कुटुंबिय व गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.

‘त्या’ इसमाचा शोध सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : वैनगंगा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या घाटकुळ येथील विनोद भाऊजी बोडेकर यांचा शुक्रवारपासून शोध घेतला जात आहे. आपत्कालीन मदत सेवा केंद्राची पाणबुडी बोट व ४ गोताखोर यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही आजपर्यंत त्यांचा मागमूस न लागल्याने कुटुंबिय व गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील शेतशिवारात मोटारपंप काढण्यास गेलेले विनोद बोडेकर हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना ६ जुलैला घडली होती. कुटुंबिय व गावकºयांच्या सहकार्याने पोलीस, महसूल विभागाने शोधमोहिम राबवित आहे. परंतु, अजूनपर्यंत त्यांना शोधण्यात यश आलेले नाही.
या घटनेने विनोदच्या कुटुंबियांवर आघात कोसळला असून पत्नी शिल्पा (२७) आपल्या ३ महिन्याच्या मुलीसह गहिवर करीत आहे. तपास कार्यात पोंभुर्णाचे ठाणेदार सुधीर बोरकुटे लक्ष घालून असून यांत्रिक बोटीवर फिरत आहेत.
शोध मोहिमेवर गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, नायब तहसीलदार सुनील गावंडे, आनंद हिराणकर, नायब तहसीलदार किशोर येरणे, पोंभुर्णाचे तहसीलदार पल्लवी टेमकर, तलाठी मोगरे, भोयर लक्ष ठेवून आहेत.