शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
3
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
4
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
5
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
6
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
7
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
8
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
9
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
10
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
11
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

न्यायवैद्यक अहवालानंतरच आत्महत्येवर शिक्कामोर्तब, पाेलीस परिस्थितीजन्य पुरावे पडताळून पाहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:47 IST

Sheetal Amte News : अतिविशेष व्यक्तीचे प्रकरण असल्यामुळे न्यायवैद्यक तज्ज्ञही अहवालात त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेत आहेत. त्यामुळे पुरावे आणि न्यायवैद्यक अहवालाची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कर्षावर पोहोचता येईल, असे सूत्रांनी सांगितले.

चंद्रपूर - आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्याच केली असावी, असा निष्कर्ष काढण्याइतपत पुरावे पोलीस तपासात पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अतिविशेष व्यक्तीचे प्रकरण असल्यामुळे न्यायवैद्यक तज्ज्ञही अहवालात त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेत आहेत. त्यामुळे पुरावे आणि न्यायवैद्यक अहवालाची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कर्षावर पोहोचता येईल, असे सूत्रांनी सांगितले.डाॅ. शीतल यांचे आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस रहस्यमय बनत  चालले आहे. अद्याप मृत्यूचे नेमके कारण पुढे आलेले नाही. आत्महत्या का केली, ही बाबही रहस्यच आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी डाॅ. नीलेश पांडे यांच्या माहितीनुसार, डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूपूर्वीच्या सर्व घडामोडींचा तपास जवळपास पूर्णत्वाकडे आला आहे. तरीसुद्धा तपासात उणिवा राहू नयेत, म्हणून सगळ्या शक्यता गृहीत धरून  तपास सुरू ठेवण्यात आला आहे. 

डाॅ. शीतल यांनी आत्महत्याच केली, ही बाब एकूणच तपासावरून स्पष्ट होते. परंतु, त्यांच्या शरीरातील औषध आणि घटनास्थळी आढळलेले औषध यांचा ताळमेळ न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाशी जुळवल्यानंतरच त्याची खात्री होईल.न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञही अतिशय काळजीपूर्वक अहवाल तयार करीत आहेत. त्यात कसली उणीव राहू नये, याची दक्षता घेतली जात असल्यामुळे अहवालास उशीर होत आहे. तपासातील संशयास्पद बाबींकडेही न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे लक्ष आहे. औषधाची मात्रा मृत्यूस कितपत कारणीभूत ठरली, ही बाबही तज्ज्ञ तपासत आहेत. पोलीस तपासातील काही बाबींची पडताळणीही तज्ज्ञ करीत आहेत. 

सायबर सेलच्या रिपोर्टलाही उशीरडाॅ. शीतल यांच्या घरातून त्यांचे दोन मोबाइल, एक लॅपटाॅप व एक टॅब हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेऊन ते चौकशीसाठी मुंबईला सायबर सेलकडे पाठविले आहे. याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. या अहवालाला बराच उशीर होत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र