पाचगावातील दारू दुकानांना सील

By Admin | Updated: May 27, 2014 00:45 IST2014-05-27T00:45:05+5:302014-05-27T00:45:05+5:30

तालुक्यातील पाचगाव येथील दोन बीअर बार बंद करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत एकमताने पारित झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार दुकानाना सील ठोकून बंद करण्यात आले.

Seal the pancake liquor shops | पाचगावातील दारू दुकानांना सील

पाचगावातील दारू दुकानांना सील

ब्रह्मपुरी : तालुक्यातील पाचगाव येथील दोन बीअर बार बंद करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत एकमताने पारित झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार दुकानाना सील ठोकून बंद करण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यातील पाचगाव या छोट्याशा गावात आरमोरी येथील दिलीप जेठमल मोटवानी व प्रशांत मनोहर मोटवानी यांच्या मालकीचे दोन बीअर बार होते. या बारमुळे गावातील अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेक युवक दारूच्या आहारी गेले. महिलांच्या छेडखानीचे प्रकार वाढले. असे असतानाही मोटवानी यांनी नवीन देशी दारू दुकान सुरु करण्याकरिता हालचाली सुरु केल्या. काही महिन्यांपूर्वी महिलांनीच ग्रामसभेत नवीन देशी दारू दुकानाला परवानगी नाकारली व राष्टÑसंत तुकडोजी महाराज दारुमुक्ती अभियानाच्या माध्यमातून दोन्ही दारू दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली. या मागणीकरिता श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी व येथील सरपंच अरुण तिवाडे यांनी पाठपुरावा सुरु ठेवला. त्यानुसार संवर्ग विकास अधिकारी सानप यांच्या अध्यक्षतेखाली १७ मे रोजी ग्रामपंचायतीच्या आवारात महिला ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत एकूण १४५ महिला मतदारांपैकी १०४ महिलांनी १४५ विरुद्ध शून्य मतांनी दारुबंदीच्या बाजूने कौल दिला. यामुळे एकमताने दारुबंदीचा ठराव पारित झाला. ठराव पारित झाल्यानंतरही महिला थांबल्या नाहीत. जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन आदेश काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आदेश काढून प्रथमेश व विनायका या दोन्ही बारला सील ठोकले. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात पूर्णत: दारूबंदी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seal the pancake liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.