तपोभूमीत लोटणार गुरुदेव भक्तांचा सागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:27+5:30
अमरावती जिल्ह्यातील यावली गावात जन्म झाला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा (गुंफा) या भूमीला ओळखले जाते. चिमूर तालुक्यात महाराजांच्या भजनाने मोठी क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे परिसरातील जनतेमध्ये महाराजांविषयी मोठे प्रेम आहे. त्यामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे.

तपोभूमीत लोटणार गुरुदेव भक्तांचा सागर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : समस्त मानवजातीला मानवतेचा संदेश देणारे तथा भजनाच्या माध्यमातून जनजागृती घडवून क्रांती करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ज्या भूमीत राष्ट्रसंतांनी साधना केली, त्याच गोंदेडा (गुंफा) भूमीत भरणाऱ्या यात्रेसाठी शुक्रवार १० जानेवारीला विदर्भातील गुरुदेव भक्तांचा सागर लोटणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील यावली गावात जन्म झाला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून चिमूर तालुक्यातील गोंदेडा (गुंफा) या भूमीला ओळखले जाते. चिमूर तालुक्यात महाराजांच्या भजनाने मोठी क्रांती घडवून आणली. या क्रांतीमुळे परिसरातील जनतेमध्ये महाराजांविषयी मोठे प्रेम आहे. त्यामुळे या परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे.
गोंदेडा (गुंफा) येथे राष्ट्रसंतांनी १९५९ ला घुगरी काला केला. नंतर महाराजांनी या भूमीत १९६१ ला पहिली यात्रा भरवली.
तेव्हापासून अविरत ही यात्रा परिसरातील गुरुदेव भक्तांकडून भरविण्यात येते. या तीन दिवस चालणाºया यात्रा महोत्सवासाठी दरवर्षी लाखो गुरुदेवभक्त श्रद्धेने गोंदेडा या गावात येऊन गुरुदेवापुढे नतमस्तक होऊन एक नवी ऊर्जा घेऊन जातात.
१० जानेवारी ला आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या निमित्ताने विदर्भातील हजारोच्या संख्येने गुरुदेव भक्त गोंदोडयात दाखल होणार असून आयोजकांनी तयारी पूर्ण केली आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गोंदेडा येथे शुक्रवारी होणाºया गोपाल काल्यासाठी लाखो गुरुदेवभक्त तपोभूमी येथे येतात. या गुरुदेव भक्तांना त्रास होऊ नये व शांतता सुव्यवस्था राहावी, याकरिता १० अधिकारी व २७५ पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर ड्रोन कॅमेºयाद्वारे परिसरावर बारिक लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले यांनी दिली.
चिमूर आगरातून जादा बसची व्यवस्था
तपोभूमी गोंदेडा येथे येणाऱ्या गुरुदेवभक्तांसाठी चिमूर ते गोंदेडा अशी जादा बसची व्यवस्था रविवारपासून करण्यात आली असून या फेºया अर्ध्या-अर्ध्या तासाने व नागरिकांच्या गरजेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती चिमूरचे आगार व्यवस्थापक आर. एस. बोधे यांनी दिली.