शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरच्या एसडीओंनी स्वत:च केली अनधिकृत नळजोडणी

By admin | Updated: June 5, 2014 23:55 IST

येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात स्वत:च अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतल्याचा प्रकार आज उजेडात आला. गंभीर बाब म्हणजे टाकी भरण्याच्या मुख्य

चंद्रपूर: येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात स्वत:च अनधिकृतपणे नळजोडणी करून घेतल्याचा प्रकार आज उजेडात आला. गंभीर बाब म्हणजे टाकी भरण्याच्या मुख्य पाईपलाईनच्या एअर वॉलवरून ही नळजोडणी करण्यात आली आहे. महानगर पालिका याविषयात आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सिव्हील लाईनमध्ये विविध शासकीय अधिकार्‍यांची निवासस्थाने आहेत. त्यातील एक निवासस्थान येथील उपविभागीय अधिकारी संजय दैने यांना मिळाले आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना व शहरात पाणी पुरवठा करणार्‍या उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीशी संपर्क साधून २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी नळजोडणी करून द्या, अशी मागणी केली. मात्र २४ तास पाणी पुरवठा होईल, अशी कोणतीही पाईप लाईन नसल्याने तशी नळजोडणी देता येणार नाही, अशी भूमिका उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतली. मात्र नियमित नळजोडणी करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यादरम्यान, गुरूवारी उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी स्वत: नळजोडणी करून देणार्‍या खासगी कारागिराला बोलाऊन पाण्याची टाकी भरणार्‍या मुख्य पाईपलाईनच्या एअर वॉलवरून नळजोडणी करून घेतली. यासंदर्भात उज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक योगेश समरीत यांना विचारणा केली असता, त्यांनीही या बाबीला दुजोरा दिला. अशा बेकायदेशिर पद्धतीने कुणालाही नळजोडणी करता येत नाही. उपविभागीय अधिकार्‍यांनी २४ तास पाणी पुरवठा होईल, अशी नळजोडणी करून मागितली होती. मात्र ते शक्य नव्हते, असे समरीत म्हणाले.  (प्रतिनिधी)