बाहेरून आलेल्या १३,३३९ नागरिकांची स्क्रिनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:14+5:30

नागपूर मार्गावरील थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रात आपली नोंदणी करीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत हे केंद्र कार्यरत आहे. आजपर्यंत बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांनी या केंद्रात नोंदणी करीत तपासणी करून घेतली आहे.

Screening of 13,339 outsiders | बाहेरून आलेल्या १३,३३९ नागरिकांची स्क्रिनिंग

बाहेरून आलेल्या १३,३३९ नागरिकांची स्क्रिनिंग

ठळक मुद्दे२४ तास स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट टेसिंग केंद्र कार्यरत । रुग्ण मिळण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला चंद्रपुरात प्रवेश करण्यापूर्वी नागपूर मार्गावरील थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रात आपली नोंदणी करीत आरोग्य तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत हे केंद्र कार्यरत आहे. आजपर्यंत बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांनी या केंद्रात नोंदणी करीत तपासणी करून घेतली आहे.
शहरात प्रवेश करण्याआधी थर्मल स्क्रिनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसींग केंद्रावर आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. चंद्रपूर मनपातर्फे सांभाळले जाणारे हे तपासणी केंद्र २४ तास सुरु राहते.
आयुक्त राजेश मोहिते यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात नोडल अधिकारी म्हणून डॉ. विजया खेरा यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे. त्यांना सहाय्यक म्हणून शरद नागोसे काम बघत आहेत.
स्क्रिनिंगदरम्यान इतर देश, राज्य, जिल्हा, शहरातून वाहनाने, रेल्वेने आलेल्या व्यक्तींची मागील २८ दिवसांपासूनची माहिती घेतली जाते.
यात कोणत्या भागातून आले, येथील संपूर्ण पत्ता, कुठे थांबले, कुठे भेट दिली, कोणत्या वाहनाने आले, मोबाईल क्रमांक अशी संपूर्ण माहिती घेऊन ट्रॅव्हल हिस्ट्रीचा माग काढला जातो, ट्रेसींग केले जाते. त्यानंतर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले जाते वा त्यांची इच्छा असल्यास स्वखर्चाने हॉटेल क्वारंटाईनमध्ये पाठविण्यात येते. कुणीही प्रशासनाला न कळविता शहरात प्रवेश केल्यास अशा नागरिकांचा मागोवा महानगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे घेण्यात येतो. यात नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळते.
आरोग्य कर्मचारी अशा व्यक्तींच्या घरी पोहचतात व त्यांना क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाईन केल्यावर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येते. परिणाम पॉझिटिव्ह आल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते व त्यांच्यावर कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येतात. ८ मे पासून बाहेरून आलेल्या १३ हजार ३३९ नागरिकांची या केंद्रात स्क्रिनींग करण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.

Web Title: Screening of 13,339 outsiders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.