शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पार्थिव नेणारी स्कॉर्पिओ उलटली; एक ठार, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 12:23 IST

जानाळा येथील घटना : जखमी तिघांना मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविले

मूल (चंद्रपूर) : चंद्रपुरातून मृत कामगाराचे पार्थिव छत्तीसगडमध्ये नेणारी स्कॉर्पिओ उलटल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना मूल-चंद्रपूर मार्गावरील जानाळा येथे मंगळवारी (दि. २९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन मोहन साखरे (वय ३, रा. बुटाई, ता. अर्जुनी, जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. जखमी तिघांना मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

चंद्रपूरलगतच्या पडोली-लखमापूर कोळसा डेपोतील कामगार केशवराव यादव (६०) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांचा मृतदेह छत्तीसगडमधी बोहरमभेडी येथे नेण्यासाठी नातेवाईक छगनलाल साहू व इतर दोघे स्कॉर्पिओने निघाले होते. दरम्यान, चालक अश्वजित रूपचंद सहारे (२६) रा. दुर्गापूर याचे नियंत्रण सुटल्याने जानाळाजवळील पुलाला जोरदार धडक देऊन स्कॉर्पिओ तीनदा उलटली. यात सचिन साखरे याचा जागीच मृत्यू झाला; तर छगन किरपाराम साहू (रा. मोहरमबेडी अंबागड, चौकी छतीसगड) व अन्य तिघे जखमी झाले.

मूल पोलिसांनी अपघातातील जखमी व मृताला हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने अखेर पोलिस वाहनातूनच सर्वांना मूल उपजिल्हा रुग्णालयात हलविले. जखमींवर उपचार सुरू आहे तर अन्य वाहनाने दोघांचे मृतदेह गोंदिया व छत्तीसगडला रवाना करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूchandrapur-acचंद्रपूर