शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांचाही आता ‘मिशन बिगीन अगेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 05:00 IST

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी दुसºया दिवशी या प्रकारे एक दिवसआड विद्यार्थ्यांना बोलवावे. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये. शाळेत जेवणाची सुटी नसेल.

ठळक मुद्देनववी ते बारावी घंटा वाजणार : शाळांचे निर्जंतुुकीकरण, शिक्षकांची तपासणी

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, वसतिगृह व आश्रमशाळा सुरू करण्यासंदर्भात राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचना व निर्देश प्राप्त झाले आहेत. या निर्देशाच्या अधिन राहून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेल्या शाळा व महाविद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, वसतिगृह व आश्रमशाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी एका आदेशान्वये परवानगी दिली आहे.शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स आक्सीमीटर, हात धुण्यासाठी साबन व पाणी आदींची सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दररोज करणे आवश्यक राहील. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २२ नोव्हेंबरपर्यंत कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित रहावे.

पालकांची लेखी संमती आवश्यकविद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी दुसºया दिवशी या प्रकारे एक दिवसआड विद्यार्थ्यांना बोलवावे. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये. शाळेत जेवणाची सुटी नसेल. 

असे असणार शाळेतील नियमवर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतरच्या नियमानुसार असावी.  वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी. शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी शाळेत वावरताना त्यांनी किमान सहा फुट अंतराचे पालन करावे.  विविध इयत्तांचे वर्ग सुरु होण्याच्या व संपण्याच्या वेळामध्ये किमान १० मिनिटांचे अंतर असावे. शाळेच्या परिसरात चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत, ही मुख्यध्यापकांची जबाबदारी असेल. शाळेत प्रात्यक्षिक कार्ये घेताना विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करुन घेण्यात यावेत, म्हणजे शारीरिक अंतराचे पालन करणे सुलभ होईल.

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या