शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांविना आजपासून शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 05:00 IST

शिक्षणसंचालकांच्या पत्रानुसार शाळेमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती, तर १ ते ९ च्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यातच कोरोना संकटामुळे पुन्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे शाळा सुरूबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयावर्षीही ऑनलाईन क्लास : शिक्षकांना द्यावा लागेल अहवाल

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाळेचा पहिला दिवस, शाळा उत्सव, प्रभातभेरी, पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे रुसवे, रडने, नवीन पुस्तक, गणवेश, नवीन वर्ग मित्र मैत्रीण यापासून यावर्षीही विद्यार्थी मुकणार असून, विद्यार्थ्यांविनाच आजपासून (दि. २८) शाळा सुरू होणार आहे. दरम्यान  ऑनलाईन अभ्यासक्रमावरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे. मात्र, शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासक्रमासंदर्भातील अहवाल शिक्षण विभागाला द्यावा लागणार आहे.कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहे. मागील शैक्षणिक सत्रात वर्षभर ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मात्र परीक्षा न घेताच विद्यार्थी वर्गोन्नत झाले. दरम्यान, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आजपासून होणार आहे. मात्र, कोरोना संकटामुळे शाळा कशा पद्धतीने सुरू होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे, शिक्षणसंचालकांच्या पत्रानुसार शाळेमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती, तर १ ते ९ च्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यातच कोरोना संकटामुळे पुन्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहे. त्यामुळे शाळा सुरूबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांविना शाळा सुरु होणार आहे.शिक्षकांत संभ्रमआजपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक संचालकांच्या पत्रानुसार शाळेत उपस्थित राहायचे की, जिल्ह्यातील निर्बंधानुसार जायचे शाळेत जायचे नाही. याबाबत मात्र शिक्षकांमध्ये संभ्रम वाढला आहे.९ लाख १५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकसर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळांंमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. यावर्षी जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार ५७८ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण शिभागाने ९ लाख १५ हजार ४५८ पुस्तकांची बालभारतीकडे मागणी नोंदविली आहे. मात्र अद्यापपर्यंत पोहचली नाही.

विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होणार आहे. विद्यार्थी, पालकांकडे असलेल्या साधनांद्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य आहे. त्यांना त्या पद्धतीने, तसेच जिथे सुविधा नाही तिथे शिक्षकांद्वारे गृहभेटी, गृहपाठ जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणार असून, कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येणार नाही. सुरुवातीला काही दिवस कोरोना परिस्थिती तसेच विद्यार्थ्यांकडे असलेल्या ऑनलाईन, ऑफलाईन सुविधांसदर्भात आढावा घेऊन त्यानंतर शासन आदेशानुसार पुढील दिशा ठरविण्यात येईल.-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या