शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

शालेय पोषण आहारात आता भाकरी अन् आंबीलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 2:30 PM

शालेय पोषण आहारात आता ज्वारी, बाजरीची भाकरी अन् नाचणीची आंबीलही मिळणार आहे.

ठळक मुद्देशालेय पोषण आहाराच्या मेनूत बदल तांदळात २५ टक्के कपात

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शालेय पोषण आहारात आता ज्वारी, बाजरीची भाकरी अन् नाचणीची आंबीलही मिळणार आहे.  आहारासाठी मिळणाऱ्या तांदळात २५ टक्के कपात करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणीचा पुरवठा होणार आहे. ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीसाठी शाळांना किती ज्वारी, बाजरी, नाचणी लागेल याची माहिती जिल्हा परिषदांकडून मागविली आहे.राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) प्राचार्य यांच्यासमवेत अप्पर मुख्य शिक्षण सचिवांची नुकतीच शिक्षण परिषद झाली. या परिषदेत शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत.पहिली ते पाचवीसाठी प्रति विद्यार्थी प्रतिदिन १०० ग्रॅम व सहावी ते आठवीसाठी प्रति विद्यार्थी प्रतिदिन १५० ग्रॅम तांदूळ मंजूर केला जातो. आहारात विविधता यावी, यासाठी तांदळाची मागणी २५ टक्क्याने कमी करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी व बाजरी या धान्याचा वापर करावा. ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्याचा वापर करून विद्यार्थ्यांना देण्याकरिता विविध पदार्थ, पाककृती याची जिल्हास्तरावरून निश्चिती केल्यानंतर त्यानुसार ज्वारी, नाचणी व बाजरीची आॅक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या करिताची मागणी शिक्षण संचालनालयास सादर करावी, असे पत्र प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे. दरम्यान, सर्व जिल्ह्यांमधून ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर नोंदविलेल्या मागणीनुसार ज्वारी, बाजरी, नाचणी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनास प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे.शासनाचे शालेय पोषण आहारात बदला बाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. पोषण आहारात आता २५ टक्के बाजरीचा समावेश राहणार आहे त्याबाबतची माहिती जिल्हास्तरावर पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे- किशोर पिसे, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिमूर.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळा