शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात घोळ
By Admin | Updated: November 14, 2015 01:19 IST2015-11-14T01:19:32+5:302015-11-14T01:19:32+5:30
वरोरा तालुक्यातील भटाळा येथील पोषण आहारात घोळ झाल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल गौरकार यांनी केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात घोळ
कारवाईची मागणी : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली तक्रार
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील भटाळा येथील पोषण आहारात घोळ झाल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल गौरकार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.
भटाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा घेण्यात आली. त्यात तेल १.३३.११४ कि. ग्रॅम ऐवजी १.१०.००० कि.ग्रॅम, तिखट ०.३४.८६४ कि.ग्रॅम ऐवजी ०.२६.००० कि.ग्रॅम, चना १.२३.०० कि.ग्रॅम ऐवजी ०.८३.२० कि.ग्रॅम, असा साठा कमी आढळून आला तर तांदुळ व इतर साहित्य आणि वटाणा १.७५.००० कि.ग्रॅम शिल्लक असूनही त्याची प्रपत्र बी.मध्ये नोंद घेण्यात आलेली नाही. शालेय पोषण आहारात घोटाळा करण्यात आला असल्याची बाब यावरुन उघड झाली असून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्था समितीचे उपाध्यक्ष राहुल पवन गौरकार यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पोषण आहार मोजण्याकरिता शासनाने दिलेला वजन काटा हा दोन वर्षांपासून बंद असूनसुद्धा त्यांच्याकडे पोषण आहारचे रेकॉर्ड व पोषण आहाराचे साहित्य देण्याचे काम आहे. त्यांनी कानाडोळा करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वजन काट्याची मागणी केली नाही. कारण त्यांना धान्याची व इतर सामानाची अफरातफर करायची होती, असे गौरकार यांनी म्हटले आहे. यामध्ये संबंधित शिक्षिका तसेच मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत आहेत. विद्यार्थ्यांकरिता शासन पोषण आहार वाढवून देत आहे. मात्र यामध्ये भ्रष्टाचार करुन त्यांना योग्य असा आहार मिळत नाही. त्याकरिता संबंधितांना विचारणा करावी व योग्य कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)