शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

शासन आदेशाविनाच शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:21 AM

शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत आहे.

ठळक मुद्देकमी पटसंख्येचा ठपका : जिवतीच्या शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांचा अफलातून निर्णय

शंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत आहे. मात्र दुसरीकडे शासनाचे कोणतेही आदेश नसताना जिवती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखाने घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या या अफलातून निर्णयाने गावकऱ्यांत मोठा रोष निर्माण झाला आहे.जिवती तालुक्यातील शेणगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या भारी व लखमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत अनुक्रमे तीन आणि चार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कमी गुणवत्तेचे कारण देत शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखाने या दोन्ही शाळा बंद करण्याचा निर्णय पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडला. त्यामुळे १ जानेवारीपासून भारी जिल्हा परिषद शाळा केंद्रप्रमुखाच्या सूचनेवरुन बंद करण्यात आली आहे. येथील विद्यार्थी आणि शिक्षकांना जवळच्या चिलाटीगुडा शाळेत समायोजन करण्यात आले. तर लखमापूर येथीलही शाळा बंद करण्याच्या अधिकाºयांच्या सूचना होत्या. पण आम्ही शाळा बंद केली नाही. जवळपास आम्हाला पर्यायी शाळा नसल्याचे येथील शिक्षकाने ‘लोकमत’ला सांगितले.शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणत्याही प्रकारचे आदेशपत्र नसताना या अधिकाºयांनी गावातील सुरळीत सुरू असलेली शाळा बंद केलीच कशी, असा प्रश्न गावकरी करीत आहेत.भारी येथील शाळा एक जानेवारीपासून बंद करण्यात आली असून येथील शिक्षक व विद्यार्थी चिलाटीगुळा येथे समायोजन करण्यात आले. शिक्षकांचे हजेरीपट व महत्त्वाचे कागदपत्रे येथे आणले असून भारीच्या नावाने शाळा सुरू आहे. विद्यार्थी कधी शिक्षकाच्या गाडीवर तर कधी पायी शाळेत ये-जा करीत आहेत. मात्र काही अनुसूचित घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या महिन्यात केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली नसल्याचे शिक्षक सांगतात.चुकीचे सर्व्हेक्षण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल कराचंद्रपूर : शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या. त्यामध्ये कोरपना तालुक्यातील गोविंदपूर, गेडामगुडा, कोठोडा (खु), चनई (खु), भोईगुडा या पाच जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. ज्या प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्या तेथील विद्यार्थ्याचे १ किमीच्या आत तर माध्यमिक शाळेचे ३ किमीच्या आत समायोजन करण्याचा शासनाचा नियम आहे. मात्र कोरपना तालुक्यातून शाळेच्या अंतरासंबंधी शासनाला पाठविलेला अहवाल चुकीचा असल्यामुळे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळा ४ ते ५ किलोमीटर अंतरावर दाखविण्यात आल्या आहेत. मात्र त्या सर्व शाळा २५ ते ३० किलोमीटर अंतरावर आहेत. त्यातही त्या गावात जाण्यासाठी दळणवळणाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात दिसून येत आहे. ज्या संस्थेने शाळा तपासणी करुन चुकीचा अहवाल सादर करुन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित केले, त्याच्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा तसेच शाळा सुरु करावे, अशी मागणी कोरपनाचे पं. स. उपसभापती संभाजी कोवे, दिलीप मडावी, प्रभाकर गेडाम, भारत आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केली.केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या तोंडी आदेशाने शाळा बंद केली असून विद्यार्थ्यांचे चिलाटीगुडा येथे समायोजन केले आहे. वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करुनच शाळा बंद केली.- बी. एस. कोटनाकेशिक्षक, जि. प. शाळा, भारी.शाळेत कमी पटसंख्या असल्याने विद्यार्थी नियमित येत नव्हते. त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, यासाठी आम्ही शाळा बंद करुन विद्यार्थ्यांना चिलाटीगुडा शाळेत समायोजन केले आहे. यासंदर्भात पंचायत समितीच्या मासीक सभेत मुद्दा मांडला होता.- रुपेश कांबळेशिक्षण विस्तार अधिकारी, जिवती.