नोटबंदीच्या ५५ दिवसानंतरही तुटवडा
By Admin | Updated: January 6, 2017 01:12 IST2017-01-06T01:12:50+5:302017-01-06T01:12:50+5:30
सरकारचे निर्णयानंतर आज ५५ दिवसानंतरही पाथरी येथे बँक आॅफ महाराष्ट्राच्या खातेदारांना स्वत:चेच पैसे मिळत नाही.

नोटबंदीच्या ५५ दिवसानंतरही तुटवडा
पाथरी : सरकारचे निर्णयानंतर आज ५५ दिवसानंतरही पाथरी येथे बँक आॅफ महाराष्ट्राच्या खातेदारांना स्वत:चेच पैसे मिळत नाही. त्यामुळे लोकांना स्वत:चे पैसे काढण्याकरिता सकाळी ११ वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ताटकळत उभे राहूनही पैसे मिळत नाही.
आजही ग्राहकांना बँकेच्या गेटपासून ते रस्त्यापर्यंत दिवसभर ताटकळत उभे राहुन सुद्धा सायं. ५ वाजतानंतर रिकाम्या हाताने परत जावे लागते. पाथरी हे मुख्य गाव असून सभोवताली १० ते १२ खेडेगावातील लोकांचे खाते पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन बँकेत आहेत. गावातील आर्थिक व्यवहार याच बँकेमार्फत चालत आहे. दोनच बँका असल्याने लोकांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. बाहेरगावी लोकांना रोज येणे-जाणे करावे लागत असल्याने बरेच आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. (वार्ताहर)