सावित्रीच्या लेकींचा बससाठी पोवनीत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:40 IST2018-08-14T22:39:46+5:302018-08-14T22:40:04+5:30
मानवविकास मिशन अंतर्गत राजुरा-पवनी मार्गावरील बससेवा अनियमित असल्यामुळे त्रस्त विद्यार्थिनींनी मंगळवारी सकाळी ११ वाजता पोवनी येथे ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आगरप्रमुख आशिष मेश्राम यांनी गुरुवार दि. १६ आॅगस्टपासून शालेय वेळेत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सावित्रीच्या लेकींचा बससाठी पोवनीत ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : मानवविकास मिशन अंतर्गत राजुरा-पवनी मार्गावरील बससेवा अनियमित असल्यामुळे त्रस्त विद्यार्थिनींनी मंगळवारी सकाळी ११ वाजता पोवनी येथे ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आगरप्रमुख आशिष मेश्राम यांनी गुरुवार दि. १६ आॅगस्टपासून शालेय वेळेत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पवनी येथील विद्यार्थी गोवरी व राजुरा येथे मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जातात. यामध्ये ४० ते ५० च्या जवळपास विद्यार्थी गोवरी येथे इयत्ता ५ ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी जातात, महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे जातात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मानव विकास मिशन अंतर्गत राजुरा वरून पवनी, चार्ली बससेवा सुरू आहे. मात्र ही बस शालेय वेळात कधीच येत नाही. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसमध्ये इतर प्रवासी दाटीने बसलेले असतात. त्यामुळे पवनी येथील विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळत नाही.