घुग्घुस येथे ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:34 IST2021-01-08T05:34:17+5:302021-01-08T05:34:17+5:30
घुग्घुस : येथील आमदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात ...

घुग्घुस येथे ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती
घुग्घुस : येथील आमदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी कुसुम सातपुते, प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्ष किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्या पूजा दुर्गम, सुचिता लुटे, रिता काळे, कीर्ती पडवेकर, कांचन चंदेल, प्रतिभा बहादे उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन संचालिका सुनंदा लिहीतकर यांनी केले तर आभार शीतल कामतवार यांनी मानले. कार्यक्रमास निशा उरकुडे, पुष्पाताई रामटेके, वैशाली शंभरकर, छाया पाटील, प्रीती धोटे, अर्चना लेंडे, वंदना मुळेवार व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस
घुग्घुस : भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसच्यावतीने पंचशील चौक येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश पाईकराव, रमा सातारडे, प्रतीक्षा लभाने, जोत्स्ना डांगे, टिना निखाडे, वनिता निखाडे, कामिनी हस्तक, संभा पाटील, सोहम पाटील, गणपत लभाने असे अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीतर्फे कार्यक्रम
घुग्घुस : येथील यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडी घुग्घुसतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. जिल्हा परिषद शिक्षिका बेबी देशपांडे, माउंट काॅन्व्हेंटच्या शिक्षिका बेबी आत्राम , आम्रपाली बुद्ध विहार कमिटी महिला अध्यक्षा सखुबाई ठमके, सामाजिक कार्यकर्त्या विजया बंडावार, सरस्वती पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्वागत गीताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शिल्पा सोंडुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
यावेळी नितु जैस्वाल, सविता गोहने, वैशाली देवतळे, संध्या जगताप, माधवी मंडल, उषा आगदारी, सलमा सिद्धीकी, जनाबाई निमकर, सुनीता चुने, दुर्गा लोडे, रेखा सहारे, नर्मदा खोब्रागडे, स्वाती गांगुले, प्रतीक्षा लभाने, वैशाली निखाडे आदी महिला उपस्थित होत्या.