शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यापासून गावाला वाचवा हो, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या पुरग्रस्त गावातील महिला

By साईनाथ कुचनकार | Updated: June 20, 2023 15:32 IST

विविध मागण्यांचे निवेदन

चंद्रपूर : वेकोलीने नदीपात्रालगत उभारलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षी पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाले. पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या राखेमुळे शेती नापिक झाली आहे. शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने दिली. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. केवळ आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात तरी पुराच्या पाण्यापासून गावाचा वाचवा, या मागणीसाठी भद्रावती तालुक्यातील पिपरी दे. येथील महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी देण्यात आले.

नदीकाठावर वेकोलीने मोठमोठे मातीचे ढिगारे उभारले आहेत. या ढिगाऱ्यांमुळे पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरते. मागील वर्षी पुरामध्ये गावातील दोघांचा जीव गेला. शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले. जनावरांचा चारासुद्धा खराब झाला होता. यानंतर शासन, प्रशासन जागे झाले आणि गावात दौरे केले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत कायम उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

वर्ष उलटले मात्र अजूनही काहीही उपाययोजना झाल्या नाही. उलट मातीचे ढिगारे वाढतच आहे. ग्रामस्थांनी आजपर्यंत प्रशासनाला अनेक निवेदन दिले. मात्र न्याय मिळालाच नाही. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच संदीप खुटेमाटे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईfloodपूरriverनदीchandrapur-acचंद्रपूर