वाघाला वाचविण्यापेक्षा माणसाला वाचवा वनमंत्री : विजय वडेट्टीवार
By Admin | Updated: December 29, 2015 20:15 IST2015-12-29T20:15:16+5:302015-12-29T20:15:16+5:30
जंगलामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या माणसांवर वाघांचे हल्ले दिवसागणिक वाढत आहेत. त्या हल्यात अनेक कुटूंबातील कर्तबगार व्यक्तींना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे.

वाघाला वाचविण्यापेक्षा माणसाला वाचवा वनमंत्री : विजय वडेट्टीवार
सावली : जंगलामध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सरपणासाठी जंगलात जाणाऱ्या माणसांवर वाघांचे हल्ले दिवसागणिक वाढत आहेत. त्या हल्यात अनेक कुटूंबातील कर्तबगार व्यक्तींना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ वाघ वाचविण्यासाठीच प्रयत्न करू नये, तर माणसाच्या संरक्षणासाठीही काही उपाययोजना करावी, असे मत सावली-ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
आ. वडेट्टीवार म्हणाले, वाघांपेक्षा माणवाची किंमत अधिक आहे. वाघांच्या हल्यात मृत पावलेल्या व्यक्तीला केवळ आर्थिक मदत देवून चालणार नाही तर त्याकरिता काही ठोस निर्णय घेवून पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जंगल तोडीमुळे जंगल विरळ होत चालले आहे.
वाघांना राहण्यासाठी जंगलात जागा नाही. या कारणाने अलिकडे वाघांनी गावात घुसून पाळीव प्राण्यांना मारण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिवाय माणसावरही अनेक हल्ले केले आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण असून ही भीती दूर करून त्यादृष्टीने राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माणसांवर वाघाचा हल्ला होऊ नये, यासाठीही निर्णय घ्यावा असे आ. वडेट्टडीवारांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)