ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 22:35 IST2019-03-22T22:34:59+5:302019-03-22T22:35:24+5:30

शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.

Save the historic Ramala lake | ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा

ऐतिहासिक रामाळा तलाव वाचवा

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : तलाव परिसर फेरी उपक्रमातून वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे जलप्रदुषण टाळण्याकरिता तलावात येणारा मच्छीनाला त्वरित वळते करून जल शुद्धीकरण संयत्र उभारणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे.
चंद्रपूर शहर हे गोंडकालिन शहर आहे. गोंडराजांनी शहरात किल्ला परकोट व रामाळा तलावाची निर्मिती केली. सुमारे ५०० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेला रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असल्याने आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र तलावाचे सौंदर्य व व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले. तलावातील पाणी प्रदुषित होण्याला मच्छीनाला व शहराच्या उत्त्तरेकडून वाहणारे नाल्यातील सांडपाणी कारणीभूत आहे. बाजुला बायपास नाला असतानाही हे सांडपाणी तलावात येत आहे. जागतिक जलदिनाचे औचित्य साधून इको-प्रोने तलावातील प्रदुषणाला कारणीभुत घटक नागरिकांच्या प्रतिक्रीया जाणुन घेण्याकरिता 'तलाव परिसर फेरी' कार्यक्रम घेण्यात आला.
ही फेरी रामाळा तलाव ते प्रदुषित करणाऱ्या स्त्रोतांपर्यत काढण्यात आली. रामाळा तलावाच्या वरील भागातील वेकोलि खाण परिसरातुन वाहणाऱ्या मच्छीनाला व त्याला पर्यायी असलेल्या नाल्याच्या बाजुने फिरून वस्तुस्थिती जाणुन घेतली. यामध्ये कार्यकर्ते सहभागी झाले.
रामाळा तलाव इकोर्नियामुक्त करा
तलावातील पाणी अधिक प्रदुषित होत असल्याने ते नदीच्या प्रवाहात सोडता येणार नाही, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले. यामुळे तलाव खोलीकरणाच्या कामात अडचण निर्माण झाल्या. त्यामुळे तलावात येणारे मच्छीनाला व दुषित सांडपाणी किमान तलावाला लागुन असलेल्या नाल्यात सोडल्यास तलाव सुरक्षित राहिल. शिवाय इकोर्निया वनस्पतीमुक्त रामाळा तलाव ही मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विहीर, हातपंपावर अनिष्ट परिणाम
२००८ रोजी रामाळा तलावात इकोर्निया वनस्पती वाढले असता स्वच्छता अभियान राबविण्यात आली होती. शासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या पुढाकाराने तलाव इकॉर्नियामुक्त झाला होता. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. तलावातील पाण्याची दुर्गधी सुटली. नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन होत आहे. तलावालगतच्या विहिरी व हातपंपावर अनिष्ट परिणाम झाला. रामाळा तलावातील प्रदुषित पाण्याबाबत मागील वर्षभरापासुन इको-प्रो सतत प्रयत्नशिल असूल खोलीकरणाची मागणी करत आहे. पत्रके वाटून स्वाक्षरी अभियानही सुरू केले.

Web Title: Save the historic Ramala lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.