इरई नदीच्या काठावर सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:52 IST2019-01-27T22:51:50+5:302019-01-27T22:52:24+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नद्या वाचवा, बंधारे बांधा, पाणी अडवा या मागणीसाठी विदर्भ किसान मजदूर कांग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील इरई नदीच्या तिरावर सत्याग्रह करण्यांत आले.

इरई नदीच्या काठावर सत्याग्रह
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नद्या वाचवा, बंधारे बांधा, पाणी अडवा या मागणीसाठी विदर्भ किसान मजदूर कांग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील इरई नदीच्या तिरावर सत्याग्रह करण्यांत आले.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती संबधित प्रश्न, बेरोजगारी, शेतीला व उद्योगाला लागणाºया पाण्याकरिता जिल्ह्यतील सर्व नद्यांवर बंधारे बॅरेजेस बांधावे या मागण्यासाठीहे सत्याग्रह करण्यात आले.
या सत्याग्रहामध्ये गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, वााीचे माजी आमदार वामनराव कासावार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया, गजानन गावंडे, मनपा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, अॅड अविनाश ठावरी, अॅड. देविदास काळे, देशा मोटवणी, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (ओबीसी) प्रदेश सरचिटणीस तथा मनपा नगरसेवक देवेंद्र बेले, मनपा नगरसेवक अशोक नागापुरे, प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, निलेश खोब्रागडे, महेंद्र जयस्वाल, स्वप्निल तिवारी, जिल्हापरिषद सदस्य शिवचंद काळे, विनोद अहिरकर, अविनाश जाधव, रामभाऊ टोंगे, बल्लारपूर नगरपालिका माजी नगरसेवक नासीर खान, अॅड. मेघा भाले उपस्थित होते.