सास्ती कॉलरी पतसंस्थेला पन्नास लाखांचा नफा - नरसाला नुकला अध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:23+5:302021-07-22T04:18:23+5:30
या संस्थेत एकूण दहा संचालक असून, एक संचालक सेवानिवृत्त झाला आहे. तीन संचालकांनी राजीनामे दिले आहेत. मात्र सहा संचालक ...

सास्ती कॉलरी पतसंस्थेला पन्नास लाखांचा नफा - नरसाला नुकला अध्यक्ष
या संस्थेत एकूण दहा संचालक असून, एक संचालक सेवानिवृत्त झाला आहे. तीन संचालकांनी राजीनामे दिले आहेत. मात्र सहा संचालक सत्तारूढ बाजूचे आहे. सास्ती भूमिगत खाणीत कार्यरत कामगारांची आर्थिक गरज लक्षात घेता १९८६ मध्ये सास्ती कॉलरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. गेल्या ३५ वर्षांत पतसंस्थेने प्रगतीचे अनेक टप्पे पार केले असून, कामगारांना दहा लाख दीर्घमुदती व ५० हजार अल्पमुदती कर्ज उपलब्ध करून दिले. सध्या या संस्थेचा अंकेशन वर्ग ‘अ’ असून, कामगारांना त्यांच्या मिळकती नुसार कर्ज दिल्याने त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण झाल्या, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नरसाला नुकला यांनी दिली. यावेळी कोषाध्यक्ष गुलाब देवगडे उपस्थित होते.