सास्ती परिसर प्रदूषण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:41+5:302021-01-09T04:23:41+5:30
प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला राजुरा : शहरात दिवसेंदिवस प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी ...

सास्ती परिसर प्रदूषण वाढले
प्लास्टिक पिशव्यांना आळा घाला
राजुरा : शहरात दिवसेंदिवस प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या दिल्या जातात़. या पिशव्या कुठेही टाकून देण्याचे प्रकार वाढल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे द्यावी, अशी मागणी शहरवासींनी केली आहे़
हिरापूर मार्गावरील खड्डे धोकादायक
नांदाफाटा : नांदाफाटा ते वणीकडे जाणाऱ्या आवारपूर-हिरापूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.यामुळे अपघाताची शक्यता आहे.. रस्त्याच्या दुरूस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे..
सुरक्षेविनाच सुरु आहेत एटीएम
वरोरा : शहरातील विविध भागांमध्ये बँकांनी एटीएम सेवा सुरु केली आहे. ग्राहक याचा लाभसुद्धा घेत आहे. मात्र काही ठिकाणी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येत आहे. भविष्यात काही धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.