सरपंचपद आरक्षण बदलासाठी चुनाळावासीय धडकले तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:58+5:302021-02-05T07:33:58+5:30

तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन दिले आहे. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या चुनाळा (मा.) येथील ग्रामपंचायतीची सदस्य ...

Sarpanchpada reservation change in Chunalawasi Dhadkal tehsil | सरपंचपद आरक्षण बदलासाठी चुनाळावासीय धडकले तहसीलवर

सरपंचपद आरक्षण बदलासाठी चुनाळावासीय धडकले तहसीलवर

तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन दिले आहे.

तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या चुनाळा (मा.) येथील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १३ असून, यात संतोषी निमकर, जया निखाडे, उषा करमणकर, संतोषी साळवे, अर्चना आत्राम, कोमल काटम, वंदना पिदूरकर या सात महिला राखीव जागेवर निवडून आल्या आहेत. नुकतीच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली असून, यात चुनाळा ग्रामपंचायतीकरिता सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गातून आरक्षण निघाले. या अगोदर १९९५ ते १९९९ व त्यानंतर अनुसूचित महिलाकरिता राखीव २०१० ते २०१५ व आताही महिलांकरिता राखीव सरपंचपदाचे आरक्षण निघाल्याने गावात आरक्षणासंबंधी रोष निर्माण झाला आहे. हे आरक्षण रद्द करण्यासंबंधी नवनियुक्त सदस्य व गाववासीयांनी मोर्चा काढत तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देऊन आरक्षण बदलण्याची मागणी केली आहे.

Web Title: Sarpanchpada reservation change in Chunalawasi Dhadkal tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.