सरपंच संघटनेची कार्यकारिणी, अध्यक्षपदी देवीदास सातपुते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:39+5:302021-03-23T04:30:39+5:30
यावेळी संघटनेच्या सल्लागारपदी वढोलीचे सरपंच राजेश कवठे यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील सरपंचाच्या या सभेत ११ सदस्यीय ...

सरपंच संघटनेची कार्यकारिणी, अध्यक्षपदी देवीदास सातपुते
यावेळी संघटनेच्या सल्लागारपदी वढोलीचे सरपंच राजेश कवठे यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील सरपंचाच्या या सभेत ११ सदस्यीय समितीची एकमुखाने घोषणा करण्यात आली.
जानेवारी २०२१ मध्ये गोंडपिपरी तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यापूर्वी सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या सात गावात सरपंचाच्या थेट निवडी झाल्या, तर जानेवारी महिन्यात ४३ गावाच्या निवडणुका पार पडल्या. असे असताना या दोन्ही टप्प्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आज एकमुखाने तालुक्यातील सरपंच संघटनेचे संघटन उभारले. यावेळी ११ सदस्यीय समितीची एकदिलाने घोषणा करण्यात आली. यात सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी देवीदास सातपुते तर हिवरा गावचे सरपंच नीलेश पुलगमकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या सल्लागारपदी वढोलीचे सरपंच राजेश कवठे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी नंदा घोघरे, कोषाध्यक्षपदी राजू राऊत, प्रसिद्धीप्रमुखपदी हेमराज चौधरी, सहसचिव सपना तामगाडगे, तर संघटनेच्या सदस्यपदी सुनील झाडे, जया सातपुते, अर्पणा रेचनकर, नीलकंठ मत्ते आदींची एकमताने निवड करण्यात आली आहे.