शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणात हरवली सर्जा-राजाची जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST

पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकरी मोठया आनंदाने आपल्या सर्जा-राजाची आंघोळ करतो,

ठळक मुद्देपोळ्याची गंमत हरवली : पशुपालनाकडे वळावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्षभर खांद्यावर भार वाहणाऱ्या बैलांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने बैलपोळा सण साजरा करतो. पण नापिकी, ओला दुष्काळ यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासोबतच २१ व्या शतकात शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. परिणामी सर्जा राज्याची जोडी कमी झाल्याचे दिसत आहे.पोळा हा बैलांचा सण. बैल हा शेतकऱ्यांचा सखा. वर्षभर शेतकरी बैलाच्या मानेवर भार वाहून शेती करतो. त्याच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकरी मोठ्या आनंदाने पोळा हा सण साजरा करतो. कोरोनामुळे पोळा हा सण घरीच साजरा करण्याच्या सुचना आहेत. परंतु, ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळीच शेतकरी मोठया आनंदाने आपल्या सर्जा-राजाची आंघोळ करतो, त्याच्या शिंगाला बाशिंग तर अंगावर विशिष्ट आकाराचा झूल टाकून त्याला सजवतो. त्यानंतर वाजत गाजत त्यांची गावातून मिरवणूक काढतो. गावातील मंदिराला प्रदक्षिणा घालून त्याचे ओक्षण करून पुरणपोळी खायला घालतो. यावेळी परिसरातील नागरिकही पूजा करतात. परंतु नापिकीमुळे जनावरांच्या वैरणाचा प्रश्न परिणामी बैल पोसणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही. तसेच यांत्रिकीकरणाची अनेक साधने तयार झाली आहेत. त्यामुळे शेतकरी जनावरांची विक्री करीत आहेत. परिणामी सर्जा-राजाची जोडी आता कमी होत आहे. तरीही ग्रामीण भागात अजूनही या जोडीनेच शेती केली जात आहे.गुराखीच मिळेना !पूर्वी जनावरे राखण्यासाठी मोठया प्रमाणात गुराखी मिळत असत. त्यांना शेतकरी पीक निघाल्यानंतर धान्य देत असत. मात्र आता त्यावर भागत नसल्याने जनावरे जंगलात चराईसाठी नेण्यासाठी गुराखीच मिळत नाही. परिणामी जनावरे चाराईसाठी नेण्याचा मोठा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.दुधाळ जनावरांकडे कलपूर्वी शेतकऱ्याकडे मोठया प्रमाणात जनावरे होती. जनावरांच्या संख्येवरून शेतकऱ्याची श्रीमंती ठरवली जायची. लग्न कार्य ठरवताना किती जनावरे आहेत, हा प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र आता वैरणाचा प्रश्न, चाऱ्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती यामुळे शेतकऱ्यांना जनावरे पोसणे कठीण झाले आहे. याउलट दूधाळू जनावरामुळे दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ जसे पनीर यासारखे विकायला मिळत असल्याने दूधाळू म्हणजेच गाय, म्हैस, शेळी अशी जनावरे पालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक