२ मार्चपासून सरस महोत्सव ‘स्वयंसिद्धा’

By Admin | Updated: February 27, 2017 00:42 IST2017-02-27T00:42:04+5:302017-02-27T00:42:04+5:30

ग्रामविकास विभाग विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने ...

Sarasv Festival 'Autosiddha' from March 2 | २ मार्चपासून सरस महोत्सव ‘स्वयंसिद्धा’

२ मार्चपासून सरस महोत्सव ‘स्वयंसिद्धा’

सांस्कृतिक कार्यक्रम: महिला बचत गटाचे आकर्षक उत्पादनाचे स्टॉल
चंद्रपूर : ग्रामविकास विभाग विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता समूहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रकरिता विभागस्तरीय सरस महोत्सवाचे आयोजन स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे २ ते ६ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्याील २५६ महिला स्वंयसहाय्यता समूहाचे स्टाल विक्री व प्रदर्शनी करीता राहणार आहेत.
सरस महोत्सव स्वयंसिद्धा २०१७ चे उद्घाटन दोन मार्चला सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, आदिवासी विकास मंत्री ना. अंबरीश राजे सत्यवानराव आत्राम यांच्या हस्ते केल्या जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, खा. अशोक नेते, आ. नाना शामकुळे, आ. मितेश भांगडिया, आ.विजय वडेट्टीवार, आ. किर्तीकुमार भांगडिया, आ. सुरेश धानोरकर, आ. संजय धोटे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, गडचिरोलीची जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोत्ती अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवण, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, बांधकाम व शिक्षण समितीच ेसभापती देवराव भोंगळे, बालकल्याण समिती सभापती सरीता कुडे, सभापती ईश्वर मेश्राम, सभापती नीलकंठ कोरांगे उपस्थित राहणार आहेत.
सरस महोत्सव स्वयंसिद्धा २०१७ मध्ये दररोज सायंकाळी ७ वाजतापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २ मार्चला प्रख्यात गजल नवाज भिमराव पांचाळ यांचा गजल गायनाचा कार्यक्रम ३ मार्च ला प्रख्यात कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता यांचे बहादार नृत्य, ४ मार्चला झाडीपट्टी भाषेतील गाजलेले नाटक ‘असा नवरा, नको ग बाई’, ५ मार्चला ओडीसी नृत्यांगणा बिंदू जुनेजा यांचे नृत्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sarasv Festival 'Autosiddha' from March 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.