संतोष लहामगे पुन्हा स्थायी समिती सभापती

By Admin | Updated: May 3, 2016 01:08 IST2016-05-03T01:08:01+5:302016-05-03T01:08:01+5:30

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्यामुळे सोमवारी मनपाच्या सभागृहात स्थायी समिती

Santosh Lohamge will again be the Chairman of the Standing Committee | संतोष लहामगे पुन्हा स्थायी समिती सभापती

संतोष लहामगे पुन्हा स्थायी समिती सभापती

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींचा कार्यकाळ संपल्यामुळे सोमवारी मनपाच्या सभागृहात स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते. या निवडणुकीत संतोष लहामगे यांची पुन्हा सभापती पदासाठी निवड करण्यात आली.
सभापती पदासाठी सत्ताधाऱ्यांकडून संतोष लहामगे व दुर्गेश कोडाम यांनी नामांकन सादर केले होते. मात्र विरोधी पक्षाकडून कोणतेही नाव समोर आले नाही. जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी नामांकन परत घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला. यात कोडाम यांनी नामांकन परत घेतले. त्यामुळे संतोष लहामगे यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभापती संतोष लहामगे यांनी शहर विकासाला आणखी गती देण्याचा मनोदय व्यक्त केला.

Web Title: Santosh Lohamge will again be the Chairman of the Standing Committee