चातुर्मासासाठी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा. चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:40+5:302021-07-20T04:20:40+5:30

चंद्रपूर : श्रमणसंघीय जैन दिवाकर मालनसिहनी कमलावतीजी म.सा. चे सुशिष्य उपप्रवर्तिनी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा., साध्वी अर्हंत ज्योतीजी म.सा., ...

Santhara Prerika Satyasadhanaji for Chaturmasa In Chandrapur | चातुर्मासासाठी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा. चंद्रपुरात

चातुर्मासासाठी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा. चंद्रपुरात

चंद्रपूर : श्रमणसंघीय जैन दिवाकर मालनसिहनी कमलावतीजी म.सा. चे सुशिष्य उपप्रवर्तिनी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा., साध्वी अर्हंत ज्योतीजी म.सा., साध्वी तन्मय दर्शनजी म.सा., साध्वी हितसाधनाजी म.सा., साध्वी हर्षप्रज्ञाजी म.सा., साध्वी गुरुचायाजी म.सा., साध्वी सोम्य ज्योतीजी म.सा., आदी ठाणा सा. हे ऐतिहासिक चातुर्मास संपल्यानंतर जामनेर येथून ३०० किलोमीटर पायी चालत चातुर्मास करण्यासाठी रविवारी चंद्रपुरात दाखल झाले.

नगीनकुमार पुगलिया यांच्या निवासस्थानी भक्तांबर स्तोत्राचा जप करून चंद्रपूर येथील जैन मंदिर, सराफा लाईन येथे जैन बांधवांनी स्वागताच्या घोषणेसह जैन मंदिरात प्रवेश करण्यात आला. तन्मय दर्शनाजींनी म.सा. पाठ केले. चार महिने-धर्म ज्ञान करावयाचे आहे, अशी माहिती साध्वी अर्हंत ज्योतीजी म. सा. यांनी दिली. अपप्रवर्तिनी संथारा प्रेरिका सत्यसाधनाजी म.सा. यांनी जैन बांधवांना धार्मिक उपासना, तपश्चर्या व जप करण्याची प्रेरणा दिली. संत बनून कर्म-श्रय करण्यासही सांगितले. घरात पंच तीर्थकरांचा जप केल्याने निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघेल. म्हणूनच दररोज जपाचे आयोजन करण्यात आले आहे. या शुभ चातुर्मास प्रवेशाप्रसंगी जामनेर, सोयेगाव, धुळे, नाशिक, भद्रावती, हिंगणघाट, वडखी येथून श्रावक दाखल झाले. या कार्यक्रमानंतर गौतम प्रसादी जैन..................... श्रावक संघाकडून ठेवण्यात आले होते. यावेळी श्रावक संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष निर्दोश पुगलिया, अमित बैद, राजेश डागा, अशोक बोथरा, जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगड, रवींद्र बैद आदी उपस्थित होते.

Web Title: Santhara Prerika Satyasadhanaji for Chaturmasa In Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.