विसापुरात संत रविदास जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST2021-03-04T04:53:08+5:302021-03-04T04:53:08+5:30

विसापूर : चंद्रपूर येथे पंचशील चौकामधील विठ्ठल रुक्माई मंदिरात संत रविदास पंच मंडळ चंद्रपूर व संत रविदास नवयुवक मंडळाच्या ...

Sant Ravidas Jayanti in Visapur | विसापुरात संत रविदास जयंती

विसापुरात संत रविदास जयंती

विसापूर : चंद्रपूर येथे पंचशील चौकामधील विठ्ठल रुक्माई मंदिरात संत रविदास पंच मंडळ चंद्रपूर व संत रविदास नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम पंच मंडळाचे अध्यक्ष मुकुंदा काकडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आणि त्यानंतर संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी ॲड. आशिष मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी संत रविदास महाराजांचे स्मृतिचिन्ह भेट स्वरूपात समाज बांधवांना दिले. नवयुवक मंडळाचे अध्यक्ष विप्लव लांडगे, राजू अंडेलकर, दिनेश वरटकर, प्रणय काकडे, ज्ञानेश्वर काकडे, संतोष नवले, सुधीर नवले, संत रविदास कृती समितीचे अध्यक्ष किशोर वरटकर, संतोष नवले, अतुल काकडे, तुषार काकडे, प्रफुल नवले, आतिश पिंपळकर, कुणाल काकडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला लक्ष्मी बिछायत केंद्राचे संचालक मच्छिंद्र काकडे व दुर्गा विछायत केंद्राचे संचालक कार्तिक लांडगे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रवीण नवले यांनी केले.

Web Title: Sant Ravidas Jayanti in Visapur