स्वच्छता कर्मचारी संघ नगराध्यक्ष चषकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:25+5:302021-02-05T07:33:25+5:30
बल्लारपूर : येथील एफडीसीएम मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात नगर परिषद ...

स्वच्छता कर्मचारी संघ नगराध्यक्ष चषकाचा मानकरी
बल्लारपूर : येथील एफडीसीएम मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात नगर परिषद स्वच्छता कर्मचारी संघाने पोलीस संघावर मात करून नगराध्यक्ष चषक पटकावला आहे.
यामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक, माजी नगर सेवक संघ, पत्रकार, पोलीस, डॉक्टर, वकील, व्यापारी संघ, कंत्राटदार संघ, तालुका अधिकारी संघ, नगर परिषद शिक्षक संघ, स्वास्थ्य विभाग कर्मचारी संघ, नगर परिषद कर्मचारी संघ अश्या १२ विविध संघांनी या नगराध्यक्ष चषक क्रिकेट सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता. यात विजय मिळविण्यासाठी सर्वच संघांनी सरावाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली होती. आज या स्पर्धेचा अंतिम सामना दुपारी २ वाजता झाला. नगर परिषद स्वच्छता विभाग संघ आणि पोलीस संघात मोठा अटीतटीच्या सामन्यात जोरदार खेळी खेळत नगर परिषद स्वच्छता कर्मचारी संघ अंतिम फेरीत विजयी झाले आहेत. विजयी संघाला वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजय सरनाईक, नगरसेवक उपस्थित होते.