हल्या घाटावर परत रेती तस्कराचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:50+5:302021-01-25T04:28:50+5:30

१४ जानेवारीला उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांनी घुग्घूसच्या हल्या घाटावर पहाटे धाड टाकून २४ ट्रॅक्टर नदीपात्रताच पकडले. त्यानंतर रेती तस्करीला ...

Sand smuggling back to Halya Ghat | हल्या घाटावर परत रेती तस्कराचा धुमाकूळ

हल्या घाटावर परत रेती तस्कराचा धुमाकूळ

१४ जानेवारीला उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांनी घुग्घूसच्या हल्या घाटावर पहाटे धाड टाकून २४ ट्रॅक्टर नदीपात्रताच पकडले. त्यानंतर रेती तस्करीला आळा बसेल, अशी धारणा होती. मात्र, या धाडीनंतर त्याच दमाने परत रेतीतस्करी सुरू केली आहे. रेती तस्करीच्या लाॅबीचे नेटवर्क मोठे असल्याने महसूल विभागाला परत अशी धाड यशस्वी होणे कठीण आहे. घुग्घूसच्या मंडळ अधिकारी किशोर नवले व पटवारी दिलीप पिल्लई यांनी याकडे लक्ष केंद्रित केले असले तरी रेती तस्करांच्या नेटवर्कमुळे सदर घाटावरन ट्रॅक्टर पकडणे शक्य होत नसल्याचे कळते.

परिसरातील बांधकाम करणाऱ्या लोकांना परवाना प्राप्त रेती उपलब्ध करून द्या, अशी मागणी आता जोर धरत आहे. अनेकांचे बांधकाम थांबले आहे.

Web Title: Sand smuggling back to Halya Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.